Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीक्राईम

Pune crime : पुण्यात जोडप्याचा धक्कादायक अंत; प्रेयसीचा खून करत स्वतः केली आत्महत्या!

Pune crime : पुण्यात जोडप्याचा धक्कादायक अंत; प्रेयसीचा खून करत स्वतः केली आत्महत्या!

नातेवाईकांचा विरोध न पचल्याने केले खळबळजनक कृत्य

पुणे : पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत (Pune crime) प्रचंड वाढ झाली आहे. ज्या ठिकाणाला विद्येचे माहेरघर समजले जाते, त्या ठिकाणाला कलंक लावणार्‍या घटना घडत आहेत. कधी खून, हाणामारी, गोळीबार तर कधी कोयता गँगच्या दादागिरीमुळे पुणे हादरलं आहे. त्यातच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या हडपसर (Hadapsar) येथे प्रेमप्रकरणाला नातेवाईकांनी केलेल्या विरोधामुळे एका तरुणाने प्रेयसीचा खून केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना १३ मे रोजी घडली असून नातेवाईकांच्या केलेल्या चौकशीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे हडपसर भागात खळबळ उडाली आहे.

मोनिका कैलास खंडारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव तर आकाश अरुण खंडारे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याचे होते. दोघे एकमेकांचे नातेवाईक असून मागील काही वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात होते. आकाश शेती करायचा तर मोनिका नोकरी करत होती. परंतु मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यांनी कुटुंबियांना सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्यांचा प्रेमाला विरोध होता. त्यामुळे दोघेही गावाहून पुण्यात पळून आले होते.

पुण्यात स्पॉटलाईट हॉटेलमध्ये दोघांनी खोली भाड्याने घेतली होती. १३ मे रोजी मध्यरात्री आकाशने मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. दोघे जण मृतावस्थेत सापडल्याची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. अधिक तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment