मुंबई: बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूरला एक वाईट सवय आहे. ती ज्या कोणत्या हॉटेलमध्ये जाते तेथून ती उशी आणते.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने या वाईट सवयीबद्दल सांगते. जान्हवीने सांगितले, जेव्हा मी प्रवास करते तेव्हा अनेकदा मी स्वत:ची उशी घेऊन फिरते. ते यासाठी ज्यामुळे मी आरामात फ्लाईटमध्ये झोपू शकेन. अनेकदा मी ते घेऊन जायला विसरले तर मी हॉटेलमधून उशी घेते. फार कमी वेळा असे होते की त्यासाठी परवानगी घेते.
नाहीतर मी अशीच उचलून आणते. लहानपणी मला आठवतंय की मी एका दुकानातून सामान घेऊन आले होते आणि आई-वडिलांना मी हे सांगितलं नव्हतं. मी पैसे न देता सामान आणले होते. जेव्हा नंतर माझ्या आई-वडिलांना हे समजले तेव्हा ते मला म्हणाले की मी अशी कोणत्याही दुकानातून सामान चोरी करू शकत नाही तेही पैसे न दिल्याशिवाय. ते मला चोर म्हणाले होते.
जान्हवी नुकतीच राजकुमार रावसोबत मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमात दिसली. ५ दिवसांत या सिनेमाने २० कोटीहून अधिक कमाई केली आहे. यासोबतच जान्हवी आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. शिखर पहाडियासोबत जान्हवी रिलेशनशिपमध्ये आहे.