मुंबई : महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस याचा समावेश असणाऱ्या महायुतीच्या संख्याबळात घट झाली असून काँग्रेस, शपग राष्ट्रवादी, उबाठा गटाची शिवसेना यांचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने मात्र राज्यात मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी गणल्या जाणाऱ्या मुंबईवर मात्र महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहीले असून महायुतीला मुंबईत दणदणीत पराभव स्विकारावा लागला आहे.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी तीन जागांवर उबाठा गटाची शिवसेना, एका जागेवर काँग्रेस अशा चार जागांवर महाविकास आघाडीला तर भाजपाला व शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. महायुतीकडून मुंबईत भाजपाने तीन जागा तर शिवसेनेने तीन जागा लढविल्या होत्या. शिवसेनेच्या राहूल शेवाळे, आमदार यामिनी यशवंत जाधव या शिवसेनेच्या दोन उमेदवारांना उबाठा गटाच्या शिवसेनेच्या अनिल देसाई, अरविंद सावंत यांनी पराभूत केले आहे. उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य मुंबई) हा गेल्या काही निवडणुकांपासून भाजपाचा बालेकिल्ला गणला जात असून या ठिकाणी भाजपाचा उमेदवार बदलत गेला तरी या जागेवरुन भाजपाचाच उमेदवार विजयी होत होता. या मतदारसंघात उबाठा गटाच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील विजयी झाले आहेत.
उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाने पूनम महाजन यांना तिकीट नाकारत त्याजागी अॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. त्या ठिकाणी काँग्रेसच्या वर्षां गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकिट नाकारत पियुष गोयल यांना उमेदवारी दिली होती. उत्तर मुंबई मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याने पियुष गोयल मोठे मताधिक्य घेत विजयी झाले आहेत. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…