Foreign Direct investment : थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी पहिल्या क्रमांकावर!

Share

बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते

गुजरात दुसऱ्या क्रमांकावर तर तिसर्‍या क्रमांकावर कर्नाटक; फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

मुंबई : महाराष्ट्रातील कंपन्या गुजरात व इतर राज्यांमध्ये जात असल्याच्या कारणावरून विरोधक नेहमी सत्ताधा-यांना घेरण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पुण्यातील हिंजवडी येथील काही आयटी कंपन्या या पायाभूत सुविधा अभावी स्थलांतर करत आहेत. त्यावरून विरोधकांनी सरकारवर तोफ डागली आहे. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी थेट परदेशी गुंतवणुकीचा आकडा ट्वीट करून (Foreign Direct investment) विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.

केंद्रीय औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपीटी) गुरुवारी थेट परकीय गुंतवणुकीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र २०२२-२३ मध्ये क्रमांक १ वर राहिल्यानंतर आता २०२३-२४ या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली आहे. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत सुमारे सात हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. या आर्थिक वर्षात १ लाख २५ हजार १०१ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

या आर्थिक वर्षात गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे. तर दुसर्‍या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्‍या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षा अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षात गुजरातमध्ये ६० हजार ६०० कोटींची परदेशी गुंतवणूक आली आहे. तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकमध्ये ५४ हजार ४२७ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते

महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आला आहे. बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Recent Posts

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

25 minutes ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

44 minutes ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

55 minutes ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

57 minutes ago

आदिवासी जमातीसाठी ती ठरली आरोग्यदूत

अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…

1 hour ago