सीबीआयचा तोतया अधिकारी गजाआड!

नवी मुंबई : वनविभागाची ५०० एकर पडीक जमीन नावावर करून देण्याचा बहाणा करून दोन व्यक्तींकडून तब्बल ८० लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. सुनील हनुमंत धुमाळ (४८) असे या तोतया सीबीआयच्या अधिकाऱ्याचे नाव असून त्याने वन विभागाचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र तसेच दिंडोशी कोर्टाची बनावट ऑर्डर देऊन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. या तोतयाने इतर अनेक लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.


सीबीआय कार्यालयात चालक पदावर करत होता काम


या प्रकरणातील आरोपी सुनील धुमाळ हा सीबीआयच्या कार्यालयात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे सीबीआयची लाल दिव्याची गाडी त्याच्याकडे कायम राहत होती. याचाच फायदा उचलत त्याने सीबीआयमध्ये कामाला असल्याचे भासवण्यासाठी सीबीआयचे बनावट ओळखपत्र देखील बनवून घेतले होते.


लाल दिव्याच्या गाडीचा केला गैरवापर


त्यानंतर या तोतयाने लाल दिव्याच्या गाडीचा वापर करून कोल्हापूर येथील प्रसाद घोरपडे यांच्यासोबत ओळख वाढवून त्यांना ७० ते ८० लाखात वनविभागाची पडीक जमीन त्यांच्या नावावर करून देण्याचा बहाणा केला होता.


घोरपडे व त्यांचा मित्र प्रसाद जैन या दोघांनी त्याच्यावर विश्वास ठेवून कोल्हापूर आजरा येथील ५०० एकर वनजमीन नावावर करून घेण्यासाठी आरोपी सुनिल धुमाळ याला ८० लाख रुपये दिले होते.


वन विभागाचे ना हरकत पत्र व कोर्टाचे आदेश पत्र दिले


त्यानंतर आरोपी धुमाळ याने त्यांना भारत सरकारच्या वन विभागाचे जमीन हस्तांतरणाचे ना हरकत पत्र व सिटी सिव्हिल दिंडोशी कोर्टाचे आदेशाचे पत्रही दिले होते. मात्र जमीन हस्तांतरणाचा अंतिम आदेश देण्यास आरोपी धुमाळ याने टाळाटाळ सुरू केल्यानंतर घोरपडे यांनी धुमाळ याने दिलेल्या वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्राची तसेच कोर्टाच्या आदेशाची खातरजमा केली.


दोन्ही कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले


तेव्हा ही दोन्ही कागदपत्रे बनावट असल्याचे तसेच तो सीबीआयच्या कार्यालयात कॉन्ट्रक्ट पद्धतीवर चालक म्हणून काम करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर सुनील धुमाळ विरोधात फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली.

Comments
Add Comment

SRH vs RR Eliminator : आज IPL मध्ये होणार सर्व्हायव्हल वॉर; राजस्थान विरुद्ध हैदराबादमध्ये निर्णायक लढत, हरला तो थेट स्पर्धेबाहेर!

IPL PLAYOFF : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हायव्होल्टेज

Mumbai Railway Food Price Hike Cancelled : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! वडापाव, समोसा आणि पफचे दर जैसे थे

मुंबई : मध्य रेल्वेने १ जूनपासून वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव अखेर मागे घेतला

Central Railway Stations Food Stalls : मध्य रेल्वेच्या स्थानकांवर वडापाव, समोसा, भेळ महागणार; १ जूनपासून नवे दर लागू

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) उपनगरीय आणि प्रमुख स्थानकांवर मिळणारे लोकप्रिय स्नॅक्स आणि खाद्यपदार्थ १ जून

MHADA Lottery 2026 : म्हाडा लॉटरी २०२६ ला प्रचंड प्रतिसाद! मुंबईतील २,६४० घरांसाठी ८२ हजारांहून अधिक अर्ज; अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जाणून घ्या!

मुंबई : मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी म्हाडाची (MHADA Lottery 2026) घरांची सोडत मोठी

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा