SRH vs RR Eliminator : आज IPL मध्ये होणार सर्व्हायव्हल वॉर; राजस्थान विरुद्ध हैदराबादमध्ये निर्णायक लढत, हरला तो थेट स्पर्धेबाहेर!

IPL PLAYOFF : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हायव्होल्टेज मुकाबला खेळला जाणार आहे. मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. विजेता संघ क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सला भिडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय सामना आहे.सनरायझर्स हैदराबादने लीग टप्प्यात दमदार पुनरागमन करत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. पॅट कमिन्सच्या पुनरागमनानंतर संघाला नवी ऊर्जा मिळाली आहे. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे हैदराबाद पुन्हा फॉर्ममध्ये आली आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सकडे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेलसारखे युवा स्टार आहेत. वैभवने यंदाच्या हंगामात तुफानी फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.


हेड टू हेड मध्ये हैदराबाद आघाडीवर


आयपीएल इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 23 सामने झाले आहेत. यात सनरायझर्स हैदराबादने 14 वेळा विजय मिळवला आहे, तर राजस्थान रॉयल्सला 9 सामन्यांत यश मिळालं आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामातील दोन्ही सामने हैदराबादने जिंकले आहेत. मागील पाच सामन्यांतही राजस्थानला हैदराबादविरुद्ध एकही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे आकडेवारी हैदराबादच्या बाजूने झुकलेली दिसत आहे.दोन्ही संघ प्लेऑफमध्ये यापूर्वी दोनदा आमनेसामने आले आहेत. २०२४ च्या क्वालिफायर-2 मध्ये हैदराबादने राजस्थानचा पराभव केला होता, तर 2013 च्या एलिमिनेटरमध्ये राजस्थानने बाजी मारली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात मागील पराभवाचा बदद्ल घेण्यासाठी राजस्थानाकडे संधी आहे.



Pitch Report


राजस्थान विरुद्ध हैदराबादमधील हा सामना महाराजा यादविंद्र सिंग पीसीए स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. मुल्लानपूरची खेळपट्टी यंदाच्या हंगामात फलंदाजांसाठी स्वर्ग ठरली आहे. या मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत, तर काही संघांनी 220+ लक्ष्यही सहज पार केले आहे. या मैदानावर छोट्या बाऊंड्रीमुळे चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. त्यामुळे आजच्या एलिमिनेटरमध्येही हायस्कोरिंग सामना होण्याची शक्यता आहे.


गोलंदाजांसाठी मात्र परिस्थिती कठीण असणार आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते, पण एकदा फलंदाज सेट झाल्यानंतर धावांचा वेग थांबवणे कठीण ठरेल. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त मानली जात आहे.



संभाव्य प्लेइंग-11


सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स, शिवांग कुमार, प्रफुल हिंगे, एशान मलिंगा.


राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग, दासुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा, नांद्रे बर्गर, यशराज पुंजा.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे