
काय आहे प्रकरण?
हिंगोली : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये शिवसेना नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच सत्ताधारी आमदार जनतेला काय खरं, काय खोटं? हे सांगतील का? असा प्रश्न सुद्धा त्यांनी बांगर यांना केला होता. आता पोलिसांनीच अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगतं अयोध्या पौळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय संतोष बांगर यांनीही याचं खंडन करत अशी कोणतीही घटना झाल्याचं फेटाळून लावलं. यामुळे आता पौळ अडचणीत सापडल्या आहेत.
अयोध्या पौळ यांच्यावर हिंगोली पोलीस स्थानकात (Hingoli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्या पौळ पाटील यांनी २७ मे रोजी फेसबुक पोस्ट करत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरापुढे गोळीबाराची घटना घडल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे खळबळ माजली होती. मात्र हिंगोली पोलिसांच्या चौकशीमध्ये अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
अयोध्या पौळ यांनी फेसबुकवर खोटी माहिती पोस्टद्वारे प्रसारित करत जनतेच्या मनात भीती निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान यापूर्वी देखील आयोध्या पोळ यांच्या विरोधात हिंगोलीत अनेक वेळा गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे.