Infosys: इन्फोसिसमध्ये नाही होणार कपात, सीईओ सलील पारेख यांनी दिली खुशखबर

मुंबई: जगभरात कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. याचा परिणाम भारतातही पाहायला मिळत आहे. आयसी सेक्टर कंपन्यांवर कंपन्यांच्या कपातीचा मोठा परिणाम होत आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वाईट परिणाम कंपन्यांवर होत आहे. कर्मचाऱ्यांवर शंकाचे मोठे ढग घोंघावत आहेत.


यातच देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. इन्फोसिस कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी कपात आणि जॉब्सवर आपल्या कंपनीचा हेतू स्पष्ट केला आहे. ते म्हणाले की इन्फोसिसमध्ये कोणतीही कपात होणार नाही.


मिळालेल्या माहितीनुसार इन्फोसिसमध्ये नोकऱ्यांमध्ये कपातीची कोणतीही योजना नाही बनत आहे. आम्ही एआयमुळे कोणालाही नोकरीवरून काढणार नाही. सलील पारेख म्हणाले, इंडस्ट्रीमध्ये अनेक कंपन्या अशी पावले उचलत आहेत. दरम्यान, आमचा विचार स्पष्ट आहे. आयटी इंडस्ट्रीमध्ये अनेक कंपन्यांनी एआयचा वापर करताना मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली आहे.


सीईओचे म्हणणे आहे की मोठ्या कंपन्यांमद्ये अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी एकत्र काम करू शकतात. येणाऱ्या वर्षांमध्ये इन्फोसिस जेनेरिक एआयमध्ये हायरिंग आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून स्किल्स डेव्हलप करत राहणार. यामुळे इन्फोसिस जगातील कंपन्यांप्रमाणेच प्रत्येक मागणी पूर्ण करण्यात सक्षम होईल. टेक्नॉलॉजीचा विकास हा नोकऱ्या संपवण्याऐवजी नव्या संधी निर्माण करेल.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई