share Market : कमीत कमी जोखीम घ्या!

Share

गुंतवणुकीचे साम्राज्य – डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजार हे गुंतवणुकीचे असे क्षेत्र आहे जिथे कित्येक गुंतवणूकदारांनी अत्यंत उत्तम नियोजन करून अतिशय चांगला फायदा मिळविलेला आहे. आपण शेअर बाजारात एखादा शेअर खरेदी केल्यावर त्यात वाढ झाली आणि त्यानंतर वाढलेल्या किमतीला जर आपण तो शेअर विकला तर आपणाला फायदा होत असतो. उलट जर खरेदी केलेल्या किमतीपेक्षा जर कमी किमतीला शेअर विकला तर आपणास तोटा होत असतो. शेअर बाजारात या खरेदी आणि विक्रीत अत्यंत महत्त्वाची भूमिका असते तो म्हणजे “स्टॉपलॉस”.

“स्टॉपलॉस” या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. सरळ भाषेत बोलायचे झाल्यास नुकसान थांबविणे किंवा टेक्निकल भाषेत लॉस बुक करणे असा याचा अर्थ होतो. “स्टॉपलॉस” हा टेक्निकल अॅनालिसिस करून ठरवला जातो. “स्टॉपलॉस” म्हणजे एखाद्या शेअर्सची अशी पातळी की जर त्या पातळीच्या किंवा किमतीच्या खाली जर तो शेअर आला तर त्या शेअरमध्ये आणखी मोठी घसरण होऊ शकते आणि जर त्या पातळीच्या खाली आल्यावर आपण “लॉस बुक” केला नाही तर परिणामी आपण केलेल्या त्या गुंतवणुकीत आपले नुकसान आणखी वाढू शकते.

बऱ्याचदा अनेक नावे आणि जुने गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा वापर करताना दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना होत असलेल्या नुकसानीपेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागते. कित्येकदा अनेक गुंतवणूकदार टेक्निकलदृष्ट्या स्टॉपलॉस काय येतोय हे न पाहता आपल्या मनानेच स्टॉपलॉस ठेवतात आणि नुकसान करून घेतात. या उलट चतुर गुंतवणूकदार परिपूर्ण अभ्यास, संयम, योग्य नियोजन आणि स्टॉपलॉसचा योग्य वापर करून शून्यातून आपले विश्व उभे करतात. त्यामुळे माझ्या मते स्टॉपलॉस हा शेअर बाजारात खरेदी विक्री करीत असताना खऱ्या अर्थाने किंग मेकरची भूमिका बजावतो.

निर्देशांकाची दिशा ही तेजीची असून अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक निफ्टीची २२४०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या पातळीवर आहे तोपर्यंत निर्देशांकामधील तेजी टिकून राहील. पुढील काळाचा विचार करता भारत फोर्ज, टीमकेन, फिनोलेक्स केबल यांसह अनेक शेअर्सची दिशा टेक्निकल अ‍ॅनालीसीसनुसार तेजीची आहे. पुढील जून महिन्यात निवडणुकीचे निकाल हाती येतील त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी हलचाल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील २ आठवड्यांचा विचार करता कमीत कमी जोखीम घेऊन व्यवहार करणे हेच योग्य ठरेल. व्यवहार करत असताना योग्य तो स्टॉपलॉस लावूनच व्यवहार करा. कोणताही फार मोठा इव्हेंट असेल तर त्यावेळी निर्देशांकात फार मोठी हालचाल होणे अपेक्षित असते त्यावेळी सर्वात जास्त जोखीम ही इक्विटी मार्केटच्या तुलनेत डेरीव्हेटीव मार्केट अर्थात फ्युचर आणि ऑप्शन प्रकारात जास्त असते. त्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे.

मी माझ्या लेखमालेतील १७ जुलै २०२३ च्या लेखात “झोमॅटो” या शेअरने ८० ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजीचे संकेत दिलेले आहेत हे सांगितलेले होते. त्यामुळे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी विशेष रचना तयार झालेली असून ८२.५० रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्प तसेच मध्यम मुदतीसाठी तेजीचा व्यवहार केल्यास हा चांगली वाढ दाखविणे अपेक्षित आहे हे सांगितलेले होते. मी सांगितल्यापासून या शेअरने २०७ हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पाहायचे झाल्यास या शेअरमध्ये ३०० पेक्षा जास्त टक्क्यांची महावाढ झालेली आहे.

(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

samrajyainvestments@gmail.com

Recent Posts

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

6 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

21 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

31 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

51 minutes ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago

बर्फाचा चुरा दुधी का दिसतो?

प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…

1 hour ago