मुंबई : महाराष्ट्रात सध्या उकाड्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे अनेकजण एसी लोकलमधून (AC Local) प्रवास करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे लोकल प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र एसी लोकलचे तिकीटाचे दर जास्त असल्यामुळे काहीजण विनातिकीट घुसखोरी करत प्रवास करताना दिसतात. या गोष्टीमुळे इतर प्रवाशांना गर्दीचा तसेच अन्य काही अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून (Central Railway) मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.
मध्य रेल्वेवर दररोज ६६ एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात. ज्यात जवळपास ७८ हजार ३२३ प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र या एसीमधून अनेकजण विनातिकीट प्रवास करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशा प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी मध्य रेल्वेने एक निर्णय घेतला आहे. तिकीट काढून एसी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सेंट्रल रेल्वेने एका स्पेशल मॉनेटरिंग टीमची स्थापना केली आहे. तर आता घुसखोऱ्यांविषयी तक्रार करण्यासाठी विशेष सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
मध्य रेल्वेच्या टास्क फोर्सने एक व्हॉट्सअॅपवर हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर मेसेज करुन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तक्रार करता येणार आहे. ७२०८८१९९८७ या क्रमांकावर मेसेज करुन प्रवासी विनातिकीट प्रवाशांची, अनधिकृत व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास तक्रार करू शकणार आहेत. प्रवाशांना या क्रमांकावर केवळ मेसेज करुन तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यानंतर स्पेशल मॉनेटरिंग टीम साध्या वेशात येऊन कारवाई करेल. तातडीने तक्रारीचे निवारण न झाल्यास दुसऱ्या दिवशी टीम येऊन कारवाई करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…