Nagpur Accident : 'हिट अँड रन'ने पुन्हा खळबळ! पुण्यानंतर नागपुरातही भीषण अपघात

मद्यधुंद अवस्थेत भरधाव कारचालकाने तिघांना उडवलं


नागपूर : पुण्यातील (Pune) ‘हिट अँड रन’ (Hit And Run) प्रकरण ज्वलंत असताना नागपुरातही (Nagpur) अशाच पद्धतीची घटना घडली आहे. झेंडा चौकात एका भरधाव कारचालकाने तिघांना उडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून नागपूर पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पावले उचलली जात आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दारू आणि गांजा यांचं सेवन केलं होतं. नशेत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांनी पायी जाणाऱ्या तिघांना उडवलं आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांच्याकडून ३२ ग्रॅम आमली पदार्थ जप्त केले. त्यात दोन विदेशी दारूच्या बॉटल्स देखील मिळाल्या आहेत.



जखमींची माहिती


एका लहान बाळासह त्याची आई व एक अन्य व्यक्ती अशा तिघांना रस्त्याने जाताना उडवण्यात आलं आहे. सचिन सूर्यभान सुभेदार, नाझमिन शेख वसीम शेख (२३ वर्षे), लहान बाळ जोहान शेख वसीम शेख अशी त्यांची नावे आहेत. सुदैवाने या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र तिघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. तिघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



आरोपींची कसून चौकशी


दरम्यान, सनी चव्हाण, अंशुल ढाले, आकाश निमोरिया अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. या तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांनी त्यांना मेडिकल टेस्टसाठी पाठवले आहे. या प्रकरणी सर्व आरोपींची कसून चौकशी केली जाणार असून आज या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती डीसीपी गोरख भामरे यांनी दिली.

Comments
Add Comment

Nashik Accident : दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू

Nashik Accident : भरधाव कार थेट विहिरीत पडून ९ जणांचा हृदयद्रावक अंत

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री

पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला, ६५ जण जखमी

पुणे : राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर

संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ

Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि