Jalgaon-Pune Air Service : जळगाव -पुणे प्रवास आणखी सुपरफास्ट; करता येणार विमानप्रवास!

तिकीट बुकिंगला सुरुवात


जळगाव : गेल्या महिन्यात गोवा जळगाव (Jalgaon) हैदराबाद अशी विमानसेवा फ्लाय ९१ विमान कंपनीने सुरू केली. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पुणे विमानसेवा सुरू करण्याबाबत जळगावकरांची मागणी होती. त्यानुसार आता जळगाव-पुणे विमानसेवा (Flight Service) देखील सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे प्रवाशांचा जळगाव -पुणे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार उड्डाण ५.० योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून फ्लाय ९१ विमान कंपनीने विमानसेवा सुरू केली आहे. १८ एप्रिल पासून गोवा हैदराबादला विमानसेवा सुरू केल्यानंतर जळगाव पुणे विमानसेवा देखील सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. मागणीनुसार विमान कंपनीने पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता विमान सेवा सुरू केली आहे. ही सेवा २७ मे पासून सुरु होणार असून आठवड्यातून चार दिवस राहणार आहे.



तिकीट बुकिंगला सुरुवात


विमान कंपनीने २७ मे ते २६ ऑक्टोबर दरम्यान गोवा जळगाव पुणे या विमानसेवेचे शेड्युल तयार केले आहे. त्यानुसार तिकीट बुकिंगला देखील सुरुवात झाली आहे. यात गोवा - जळगाव - गोवा ही सेवा दररोज तर पुणे - जळगाव - पुणे ही सेवा आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी राहील.

Comments
Add Comment

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर