Deccan Queen : यंदा 'डेक्कन क्वीन'चा वाढदिवस रद्द? काय आहे कारण?

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांचेही होणार हाल


पुणे : १ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा (Deccan Queen) प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे (Mumbai-Pune) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे. पुणे-मुंबई या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे रुळावर धावणारी ही पहिली डिलक्स रेल्वे होती. या दख्खनच्या राणीचा दरवर्षी १ जून रोजी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात येतो. आपल्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे प्रवासी या कार्यक्रमात सहभाग घेतात. यावर्षी डेक्कन क्वीनला सुरू होऊन ९७ वर्ष पूर्ण होणार आहेत. मात्र यंदा या राणीचा वाढदिवस हुकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रवाशांनीही नाराजीचा सूर मारला आहे. जाणून घ्या नेमकं कारण काय.



विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) प्लॅटफॉर्मचे विस्तारिकरणाचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १० व ११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (Power Block) घेण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल (Local) आणि मेल- एक्स्प्रेसच्या (Express) वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.


भायखळा ते सीएसएमटीदरम्यान घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे २८ ते ३१ मेदरम्यान अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्यावरून मुंबईला जाणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेसचा समावेश असणार आहे. गाड्या रद्द करण्यात आल्याने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत.



कोणत्या ट्रेन रद्द?



  • सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस (२८ मे ते २ जून)

  • पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (३१ मे ते २ जून)

  • नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस (१ आणि २ जून)

  • साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस (१ आणि २ जून)

  • डेक्कन क्वीन (१ आणि २ जून)


दरम्यान, विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमध्ये मुंबई-पुणे इंटरसिटी, प्रगती एक्स्प्रेस चार दिवस रद्द राहणार आहे. तर १ आणि २ जून रोजी ‘डेक्कन क्वीन’ रद्द करण्यात आल्याने यंदाचा वाढदिवस रद्द होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Suicide : "तुमच्या पुढच्या सात पिढ्या यातना भोगतील..." मृत आईच्या त्या शेवटच्या शापाने उघडकीस आले कौटुंबिक वादाचे सत्य?

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण

Pune Accident : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात बसमधून खाली पडल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; 'त्या' एका चुकीमुळे गेला जीव?

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. धावत्या पीएमपीएमएल बसमधून अचानक तोल जाऊन खाली

Chhatrapati Sambhaji : देवा...किती किळसवाणा प्रकार! पप्पांनी कचोरी आणली अन् त्यात उंदराच्या लेंड्या; ५ पैकी २ कचोऱ्या मुलांनी खाल्ल्याने नागरिकांत संताप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर शहरात (Vaijapur Area) अन्नाची अवहेलना आणि ग्राहकांच्या

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ