Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीPushpa 2 : अ‍ॅनिमलमुळे चमकलं 'या' अभिनेत्रीचं नशीब! आता 'पुष्पा-२' मध्येही झळकणार

Pushpa 2 : अ‍ॅनिमलमुळे चमकलं ‘या’ अभिनेत्रीचं नशीब! आता ‘पुष्पा-२’ मध्येही झळकणार

आयटम साँगवर थिरकताना दिसणार

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील (South Film industry) सुपरस्टार अल्लु अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा-२’ (Pushpa 2) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. पुष्पाच्या या सिनेमातील लूकपासून ते टीझरपर्यंत सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरल्या आहेत. पुष्पाचा पहिला भाग आणि त्यातील गाणी प्रचंड गाजली होती. यातील ‘ऊ अंटावा’ या आयटम साँगलाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या गाण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) झळकली होती. मात्र, पुष्पाच्या दुसर्‍या भागातही आयटम साँग (Item Song) असणार आहे. पण यावेळी समंथा नव्हे तर दुसरीच अभिनेत्री थिरकताना दिसणार आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अ‍ॅनिमल या सिनेमामुळे रातोरात प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) असणार असल्याची चर्चा आहे. पुष्पा-२ या चित्रपटाच्या आयटम साँगमध्ये तृप्तीला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. पण चित्रपटाच्या मेकर्सनं अजून याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

तृप्तीला अ‍ॅनिमल या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि तृप्तीच्या केमिस्ट्रीने अनेकांचे लक्ष वेधले. याआधी तिने पोस्टर बॉईज आणि कला या चित्रपटांत देखील काम केले होते. ती आगामी भुलभुलैया ३ मध्ये आदित्य रॉय कपूरसोबतही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

पुष्पा-२ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील पुष्पा-पुष्पा हे पहिले गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर आता ‘अंगारों (द कपल साँग) हे गाणं २९ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक पुष्पा-२ या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -