Monday, July 15, 2024
Homeक्रीडाT20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी ICC कडून कमेंट्री पॅनेलची घोषणा, कार्तिकची...

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी ICC कडून कमेंट्री पॅनेलची घोषणा, कार्तिकची एंट्री

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ची सुरूवात होण्यास फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. आगामी वर्ल्डकप १ जूनपासून ते २९ जूनपर्यंत यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसी तयारीमध्ये व्यस्त आहे. आता आयसीीसने टी-२० वर्ल्डकपसाठी कमेंट्री पॅनेलची घोषणा केली आहे.

दिनेश कार्तिक वर्ल्डकपमध्ये करणार कमेंट्री

४० सदस्यीस कमेंट्री पॅनेलमध्ये स्टार विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकला स्थान मिळाले आहे. कार्तिक यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करत होता. दिनेश कार्तिकबाबत ही बातमी सुरू होती की तो आता आयपीएलच्या पुढील भागात सहभागी होणार नाहीत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यानंतर ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने विराट कोहली आणि आरसीबीच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या होत्या.

दिनेश कार्तिकशिवाय कमेंट्री पॅनेलमध्ये भारताकडून हर्षा भोगले, रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांना स्थान मिळालेले आहे. पाकिस्तानी दिग्गज वसीम अक्रम, वकार युनूस आणि रमीज राजाही टी-२० वर्ल्डकपमध्ये कमेंट्री पॅनेलचा भाग होतील.

दिनेश कार्तिक (भारत), डॅनी मॉरिसन (न्यूझीलंड), इयान बिशप (वेस्टइंडीज), हर्ष भोगले (भारत), रवि शास्त्री (भारत), शॉन पोलक (साउथ अफ्रीका), रिकी पाँटिंग, स्टीवन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), नासिर हुसैन (इंग्लंड), ग्रीम स्मिथ (साउथ अफ्रीका), इयान स्मिथ (न्यूजीलँड), डेल स्टेन (साउथ अफ्रीका), एलन विल्किंस (इंग्लंड), वकार यूनुस (पाकिस्तान), इयान वार्ड (इंग्लंड), लिसा स्टालेकर (ऑस्ट्रेलिया), वसीम अकरम (पाकिस्तान), अतहर अली खान (बांग्लादेश), रसेल अर्नाल्ड (श्रीलंका), माइक एथर्टन (इंग्लंड), सॅमुअल बद्री (वेस्टइंडीज), कार्लोस ब्राथवेट (वेस्टइंडीज), सायमन डूल (न्यूजीलंड), एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया)… डॅरेन गंगा (वेस्टइंडीज), सुनील गावस्कर (भारत), नताली जर्मनोस (साउथ अफ्रीका), मैथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), माइक हेसमॅन (ऑस्ट्रेलिया), जेम्स ओ ब्रायन (यूएसए), केटी मार्टिन (न्यूझीलंड), पॉमी मबंग्वा (जिम्बाब्वे), टॉम मूडी (ऑस्ट्रेलिया), इयोन मॉर्गन (इंग्लंड), एलिसन मिचेल (इंग्लंड), ब्रायन मुर्गट्रोयड (नेदरलँड्स), कास नायडू (साउथ अफ्रीका), नियाल ओ ब्रायन (आर्यलँड), एबोनी रेनफोर्ड-ब्रेंट (इंग्लंड), रमीज राजा (पाकिस्तान).

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -