SDRF Boat : उजनी घटना ताजी असतानाच प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटली!

तीन जवानांचा मृत्यू तर एकाचा शोध सुरु


अकोले : उजनी (Ujani) जलाशयात बोट उलटून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना ज्वलंत असतानाच अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आली आहे. प्रवरा नदीत (Pravara River) बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट (SDRF Boat) उलटली असून पथकातील चार जणांसह एक स्थानिक बुडाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू


यात एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून तर दोघांचा शोध सुरू आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे अथक प्रयत्न सुरु असल्याचे प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी सांगितले.



नेमकं काय घडलं?


काल प्रवरा नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली होती. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ ही शोधमोहिम सुरू होती. शोध घेण्यासाठी बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक तरुण बसला होता. एसडीआरएफच्या पथकाकडून सकाळी सहा वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात आले. याचदरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे पथकाची बोट उलटून दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत पाच जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुसऱ्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत