मुंबई : गुंतवणुकीचा विचार करताच सर्वात आधी अनेकांच्या डोळ्यांसमोर फिक्स डिपॉझिट करण्याची गोष्ट येते. मात्र या फिक्स डिपॉझिटपेक्षाही चांगला नफा देणाऱ्या तसेच सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अनेक योजना आहेत. विशेष म्हणजे या सर्व योजना भारत सरकारतर्फे चालवल्या जात असल्यामुळे तुम्ही गुंतवेलेले पैसे बुडण्याचा धोका नसतो. याच पार्श्वभूमीवर सध्या पोस्ट ऑफिसच्या एका वेगळ्या योजनेची चर्चा होत आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे थेट दुप्पट होणार आहेत. विशेषत: ही रक्कम दुप्पट करण्याची हमी सरकारने दिल्यामुळे नागरिकांना पैसे बुडण्याची भीतीदेखील वाटणार नाही.
‘किसान विकास पत्र’ (Kisan Vikas Patra- KVP) असे पोस्ट ऑफिसच्या नव्या योजनेचे नाव असून ही गॅरंटिड रिटर्न्स देणारी योजना आहे.
या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेली रक्कम थेट दुप्पट होणार असल्याची हमी सरकारकडून दिली जाते. उदाहरणार्थ, ५ लाख रुपयांचे दहा तर १० लाख रुपयांचे २० लाख रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेच्या काही अटीदेखील आहेत. या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो. किसान विकास पत्र या योजनेतून दुप्पट परतावा हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला रक्कम ११५ (९ वर्षे, ७ महिने) महिन्यांसाठी ठेवावी लागेल. म्हणजेच तुमचे पैसे हे ११५ महिन्यांनी दुप्पट होतील. तर या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर ७.५ टक्के रिटर्न्स दिले जातात.
या योजनेअंतर्गत कोणीही खातं खोलू शकतं. तुम्हाला जॉईंट खातंदेखील खोलता येतं. १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे असलेला मुलगादेखील किसान विकास पत्र योजनेअंतर्गत खातं खोलू शकणार आहे.
या योजनेत तुम्हाला खाते खोलायचे असेल तर आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट फोटो, केव्हीपी अॅप्लिकेशन फॉर्म आदी कागदपत्रांची तुम्हाला गरज पडेल. अनिवासी भारतीयाला या योजनेत पैसे गुंतवता येत नाहीत.
दरम्यान, या योजनेअंतर्गत तुम्हाला वेळेआधीच पैसे काढायचे असतील तर त्यासाठी वेगळे नियम आहेत. गुंतवणूक चालू केल्यापासून २ वर्षे ६ सहा महिन्यांनंतर तुम्ही प्रिमॅच्यूअर विदड्रॉअल करू शकता.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…