RTO New Rules : एकीकडे पुणे अपघात प्रकरणी संताप तर दुसरीकडे आरटीओचा 'हा' नवा नियम

१ जूनपासून आरटीओच्या नियमांमध्ये होणार बदल


नवी दिल्ली : पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना चिरडल्याने राज्यभरातून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच या कारला नंबर प्लेट नसल्याची व ही कार विनानोंदणी धावत असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेतील आरोपी मुलगा हा १७ वर्षांचा होता, मात्र, घटनेनंतर पाच तासांतच त्याला जामीन देण्यात आला, त्यामुळेही संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता आरटीओने काही नवे नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे सोपे होणार असून १६ व्या वर्षीदेखील लायसन्स मिळू शकणार आहे.



ड्रायव्हिंग लायसन्स काढणे झाले सोपे


आरटीओच्या नव्या नियमावलीनुसार, आता ड्रायव्हिंग लायसन्स काढणे सोपे झाले आहे. सरकारने वाहनचालकांसाठी ड्रायव्हिंग लायसेन्स टेस्टसाठी आणखी एक सोपा पर्याय उपलब्ध करुन दिल्यामुळे चालकांना आता आरटीओमध्ये जाऊन चाचणी देण्याची गरज भासणार नाही. हा नियम १ जून पासून लागू होणार असून लोकांना खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देता येणार आहे. तसेच टेस्टनंतर यासंदर्भातील सर्टिफिकेट ही ड्रायव्हिंग स्कूलमधून दिले जाईल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितले आहे.



१६ व्या वर्षीही मिळणार लायसेन्स


जर एखाद्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण झाले असेल तर त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते. पण ५० सीसी क्षमतेच्या मोटारसायकलचा परवाना वयाच्या १६ व्या वर्षीही मिळू शकतो. मात्र, हा परवाना १८ वर्षे झाल्यानंतर अपडेट करावा लागेल.


यासोबतच दंडांच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागू शकते. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने नियमांत बदल केले असून १ जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू होणार आहेत.



शुल्क किती असेल?


नवीन नियमानुसार, शिकावू लायसेन्ससाठी १५० रुपये आकारले जातील. टेस्टसाठी किंवा रिपिट रेस्टसाठी ५० रुपये अतिरिक्त आकारले जातील. ड्रायव्हिंग टेस्टसाठी ३०० रुपये आकारले जातील. लायसेन्स जारी करण्यासाठी २०० रुपये तर नवीन क्लास मिळवण्यासाठी ३०० रुपयांचे शुल्क आकारले जाईल.


त्याचबोरबर ड्रायव्हिंग स्कूलने ट्रेनिंगशिवाय ड्रायव्हिंग लायसेन्स दिल्यास ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. डुप्लिकेट लायसेन्स मिळवण्यासाठी ५०० रुपये भरावे लागतील. तर ड्रायव्हिंग लायसेन्सवरील पत्ता बदलणे किंवा इतर माहिती बदलायची असल्यास २०० रुपये शुल्क लागेल.



दंड आकारणीत वाढ


दरम्यान, वेगाने वाहन चालवण्यासाठीचा दंड एक हजार ते दोन हजार रुपये असणार आहे. पण, अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना आढळल्यास त्याला २५ हजार रुपये दंड भरावा लागेल. शिवाय, वाहन धारकाची नोंदणी रद्द केली जाईल. तसेच वयाचे २५ वर्षे होईपर्यंत अल्पवयीन चालकाला ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवता येणार नाही.


Comments
Add Comment

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

राजमाता जिजाऊ बदनामी प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २२ वर्षांनंतर मागितली माफी

पुणे : जेम्स लेनच्या 'शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावरून दोन दशकांपूर्वी

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग

पुण्यात हायव्होल्टेज सामना; आंदेकर कुटुंबाकडे किती मालमत्ता? प्रतिज्ञापत्रातून खुलासा

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये जोरदार सामना पहायला मिळणार

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे ४० जण जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या