Monday, July 22, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024: विराट कोहली की संजू सॅमसन? आज कोण मारणार बाजी

IPL 2024: विराट कोहली की संजू सॅमसन? आज कोण मारणार बाजी

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामात आज एलिमिनेटरचा सामना रंगत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने असतील. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल.

या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानच्या संघासमोर आत्मविश्वासाने भरलेल्या विराट कोहलीच्या बंगळुरू संघाचे मोठे आव्हान असणार आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृ्त्वात आरसीबीने चमत्कारिक कामगिरी करत प्लेऑफ गाठली आहे.

सलग ६ सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचला बंगळुरूचा संघ

एक वेळ अशी होती की राजस्थान टॉप २मध्ये राहील असे वाटत होते. मात्र सलग ४ सामन्यातील पराभव आणि केकेआरविरुद्धचा सामना पावसाने धुतला गेल्याने ते सनरायजर्स हैदराबादनंतर तिसऱ्या स्थानावर राहिले. दुसरीकडे आयपीएलमधून बाहेर पडण्याच्या स्थितीत असलेला बंगळुरूच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत चौथे स्थान गाठले.

बंगळुरूने सलग ६ सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचे तिकीट निश्चित केले. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता.

अहमदाबादमध्ये या संघाचे पारडे जड

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आजचा सामना रंगत आहे. या मैदानावर या हंगामात १२ डावांत केवळ दोनवेळा २०० पार धावसंख्या झाली आहे. हे स्टेडियम रॉयल्सच्या गोलंदाजांना फायदेशीर ठरू शकते. शिस्तीने गोलंदाजी करणाऱ्या संघाचे पारडे जड ठरू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -