मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत अतिरिक्त गुण मिळत असलेले दहावीचे विद्यार्थी यंदा अतिरिक्त गुणांना मुकणार आहेत. अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट पद्धतीने काम होत असल्याचे उघडकीस आल्यामुळे असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळांमध्ये अभ्यासातील विषयांव्यतिरिक्त विविध विषयांच्या परीक्षा आणि स्पर्धा घेतल्या जात होत्या. त्याआधारे विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जात होते. मात्र अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट आणि पैसे घेऊन प्रमाणपत्र मिळत असल्याचं उघड झालं आहे. तसेच शाळेत येणाऱ्या या संस्था ३०० रुपयांमध्ये हे प्रमाणपत्र बनवून देत आहेत. याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून चक्क ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, अतिरिक्त गुणांचा बाजार बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर आणि टक्केवारीवर याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…