HSC exam results : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या होणार निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्‍या बारावीच्या परिक्षांचे निकाल (12th Exam results) अजूनही प्रतिक्षेत होते. विद्यार्थ्यांसह पालकही या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या म्हणजेच २१ मे रोजी दुपारी १२ वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी निकाल कसा व कुठे पाहायचा, हे जाणून घ्या.



निकाल कसा व कुठे पाहायचा?



  • महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत mahahsscboard.in, mahresult.nic.in व results.gov.in संकेतस्थळावर जा.

  • महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा.

  • HSC निकाल लिंकवर क्लिक करा.

  • रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा.

  • १२ वीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.

  • पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करून ठेवता येईल.


राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यांच्या निकालाबाबात राज्य मंडळाने आज पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्याची असल्यास अर्ज करता येणार आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग