Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल


मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या अटकेत


मुलुंड : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दृष्टीने कालची संध्याकाळ खूप महत्त्वाची होती. काल शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एकत्रित सभा होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभेसाठी त्यांचेही नेते एकत्र जमले होते. त्याच दरम्यान, भाजपाकडून ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळालेले मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या कार्यालयासमोर राडा झाला. त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून तो ठाकरे गटाकडून (Thackeray Group) झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.


एकीकडे महायुती व महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या काल मुंबईत सभा चालू असताना दुसरीकडे मिहीर कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयात मोठा राडा सुरू झाला. त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. यानंतर कार्यालयासमोर भारतीय जनता पक्ष व ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आमने-सामने जमा झाले होते.


हा प्रकार घडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते प्रसाद लाड यांनी घटनास्थळी भेट दिली. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही घडलेल्या प्रकाराचा आढावा घेतला. यानंतर प्रसाद लाड यांनी भ्याड हल्ला म्हणत या घटनेचा निषेध केला. “संजय पाटलांना पराभव दिसू लागल्यामुळे असे हल्ले होत आहेत”, असा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर आता मिहीर कोटेचांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे.


राड्याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना मिहीर कोटेचा यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मानखुर्दचे नवाब संजय दीना पाटील…आज पंतप्रधानांच्या सभेसाठी आम्ही सगळे शिवाजी पार्कला निघाल्यानंतर तुमचे गुंड मुश्ताक खान आणि इतरांनी माझ्या वॉररूमवर भेकड हल्ला केला. माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. आज मी शपथ घेतो. निवडून आल्यानंतर तुमचे सगळे काळे धंदे, ड्रग्ज, मटका, गुटखा हे बंद करणारच. मानखुर्दचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करणारच”, असं मिहीर कोटेचा म्हणाले.





मिहीर कोटेचा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत “मुंबईकरांना आता ठरवायची वेळ आलीये की लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचा की तुमचा सेवक पाठवायचा”, असा खोचक सवालही त्यांना पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. या राड्याप्रकरणी मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत