Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्या चुकीच्या वक्तव्यांनी कायम स्वतःला अडचणीत टाकत असतात. त्यामुळे ठाकरे गटाचं (Thackeray Group) मोठं नुकसान होतं. त्यातच आता लोकसभा निवडणुका (Loksabha Election) मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात असताना संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यामुळे व त्यांची तुलना औरंगजेबाशी (Aurangzeb) केल्यामुळे संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अहमदनगरच्या (Ahmednagar) कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेकडून राऊत यांच्यावर कारवाईबाबत कोतवाली पोलिसांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम १७१(क), ५०६ आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १२३ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नेमकं प्रकरण काय?


नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत यांनी ८ मे रोजी अहमदनगर शहरातील क्लेराब्रूस मैदानावर सायंकाळी प्रचारसभा घेतली होती. या सभेत त्यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेखही केला. त्यामुळे वाद उसळला आणि राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला.



काय म्हणाले होते संजय राऊत?


संजय राऊत म्हणाले होते की, "आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल. औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला होता, तेथील माती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतील हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबाचा जन्म आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म दावत मध्ये झाला आहे. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी औरंगजेब्याच्या वृत्तीने हे दोन व्यापारी वागत आहेत. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला आहे. तर तू कोण?" अशा प्रकारे पंतप्रधानांविषयी एकेरी भाषेत वक्तव्य करणं संजय राऊतांना चांगलंच भोवणार आहे.

Comments
Add Comment

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे