Weather Update : उन्हाचा चटका कमी होणार! महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा कायम

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट


मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. राज्यभरात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत मात्र सकाळपासूनच उन्हाचा चटका आणि उकाडा कायम जाणवत आहे. यापासून नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याकडून (Meteorological Department) आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथे काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, तापमान कमी-जास्त होत आहे.



'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता



  • जळगाव, नाशिकमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

  • अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  • मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (५०-६० किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • तर उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.


'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट


जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.


Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद