Mumbai Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक

काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक


मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की अनेकदा प्रवाशांच्या चेहऱ्यावर चिंता पाहायला मिळते. ही चिंता आता पुन्हा वाढणार आहे. कारण, मध्य रेल्वेवर एकदोन नव्हे, तर चक्क पंधरा दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार १७ मे पासून शनिवार १ जूनपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.


२४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११ची लांबी वाढवण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे. यासाठी अभियांत्रिकी-विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलॉकिंग कामांसाठी आजपासून ते शनिवार, १ जूनपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉकवेळेत काही मेल-एक्स्प्रेस पनवेल, दादर स्थानकांपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. यामुळे रात्री उशिरा मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांची पुढील पंधरा दिवस गैरसोय होणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी शुक्रवार ते सोमवारदरम्यान बाधित होणारी रेल्वेगाड्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.



स्थानक - सीएसएमटी ते भायखळा


मार्ग - अप धीमा, अप-डाउन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १० -१८ दरम्यान सर्व मार्गिका
वेळ - रात्री ११ ते पहाटे ५ (रोज रात्री ६ तास)
१७ ते २० मेदरम्यान बाधित होणाऱ्या लोकल-मेल/एक्स्प्रेस



मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांवरील परिणाम


- सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ कसारा ही शेवटची लोकल
- कल्याणहून रात्री १०.३४ सीएसएमटी लोकल ही शेवटची लोकल
- सीएसएमटीहून पहाटे ४.४७ कर्जत ही पहिली लोकल
- ठाण्याहून पहाटे ४ सीएसएमटी ही पहिली लोकल
- ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाहीत.



दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस


- २२२२४ साईनगर शिर्डी – सीएसएमटी वंदे भारत
- १२५३३ लखनऊ-सीएसएमटी पुष्पक
- ११०५८ अमृतसर-सीएसएमटी
- ११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क
- १२८१० हावडा-सीएसएमटी मेल
- १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी
- २२१२० तेजस-सीएसएमटी तेजस
- १२१३४ मंगलोर-सीएसएमटी
- १२७०२ हैद्रराबाद-सीएसएमटी हुसैन सागर
- १२८१० हावडा-सीएसएमटी



दादरहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या


- २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत
- २२१५७ सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट
- ११०५७ सीएसएमटी-अमृतसर
- २२१७७ सीएसएमटी-वाराणसी महानगरी
- १२०५१ सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी


पनवेलपर्यंत चालविण्यात येणारी एक्स्प्रेस
-१०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी


पनवेलहून सुटणारी एक्स्प्रेस
- २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या

Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक