Weather Update : 'या' भागात आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

तर मुंबईत 'असं' असेल वातावरण


मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा आणि दुसरीकडे अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) थैमान घातलं आहे. अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे मुंबईत टॉवर, होर्डिंग, पूल कोसळ्याच्या घटना घडल्या तर बंगळूरमध्ये चक्क २७०हून अधिक झाडं कोसळ्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. राज्यात या अवकाळी पावसाने चांगलच रौद्र रुप दाखवलं आहे. अशातच हवामान खात्याने (Meteorological Department) बंगळूर शहराला सावधानतेचा इशारा दिला आहे.


उत्तर भारतात मे महिन्यातील कडाकाच्या उन्हानं नागरिकांची लाही-लाही होत आहे. पण दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD) कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) आज वादळ आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.



१६ ते २१ मेपर्यंत यलो अलर्ट


१६ मे ते २१ मे पर्यंत बंगळुरूमधील हवामान खूप ढगाळ असेल. तसेच, सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याचीही शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. आठवडाभर शहरात मुसळधारेचा अंदाज आहे. १६, १७ आणि १९ मे रोजी वातावरण ढगाळ असू शकतं. तसेच, अधूनमधून ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.



मुंबईतील परिस्थिती काय?


तीन दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता. या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा प्रचंड वाढला आहे. आजदेखील ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.



जागतिक स्तरावरही तापमानात वाढ


जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या तीन दशकांमध्ये जगभरात उष्माघातामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू हे भारतात झाले आहेत. कोरड्या हवामानात आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या भागात सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे निरीक्षण 'कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस' आणि नोआच्या मासिक अहवालात नोंदवण्यात आले आहे.


दरम्यान, हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार मान्सून १९ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर ३१ मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यापुढील वातावरण पोषक असेल तर मान्सून ७ ते १० जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या