Google Doodle for FIFA Final 2026 : Google Doodle वर FIFA फायनलचा जल्लोष! अर्जेंटिना विरुद्ध स्पेन अंतिम सामन्यासाठी गुगलकडून खास डुडलची रचना

नवी दिल्ली : फुटबॉल विश्वाचे लक्ष लागलेल्या FIFA World Cup 2026 च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर Google ने आपल्या होमपेजवर खास Google Doodle साकारत अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही संघांना अनोखी मानवंदना दिली आहे. आज (१९ जुलै) होणाऱ्या विश्वचषक अंतिम सामन्याच्या निमित्ताने गुगलने साकारलेले हे डूडल जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. (Google Doodle for FIFA Final 2026)


डूडलमध्ये स्पेनचा लाल आणि अर्जेंटिनाचा आकाशी निळा रंग आकर्षक पद्धतीने दाखवण्यात आला आहे. तसेच Google या शब्दातील दोन 'O' च्या जागी फुटबॉल आणि दोन्ही अंतिम फेरीतील संघांचे अधिकृत चिन्ह (क्रेस्ट) दाखवण्यात आले असून, अंतिम सामन्याचा उत्साह अधोरेखित करण्यात आला आहे.



संपूर्ण स्पर्धेत Google चे फुटबॉलप्रेम :


यंदाच्या FIFA विश्वचषकादरम्यान Google ने अनेक आकर्षक आणि सर्जनशील डूडल्स सादर केले आहेत. फुटबॉलमधील प्रसिद्ध कौशल्यपूर्ण चाली आणि ऐतिहासिक क्षणांना या डूडल्समधून विशेष स्थान देण्यात आले. (Google Doodle for FIFA Final 2026)



फ्रान्ससाठीही दिल्या होत्या शुभेच्छा :


१४ जुलै रोजी फ्रान्सच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादिवशी Google ने फ्रान्समध्ये विशेष डूडल प्रदर्शित केले होते. विशेष म्हणजे त्याच दिवशी फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस 'बॅस्टिल डे' असल्याने त्या डूडलमधून फ्रेंच संघाला शुभेच्छाही देण्यात आल्या होत्या. (Google Doodle for FIFA Final 2026)



फुटबॉलमधील प्रसिद्ध स्किल्सना डूडलमधून सलाम :


२ जुलै रोजी Google ने 'The Art of Step Over' (Pedalada) या नावाने डूडल सादर केले होते. या डूडलमधून फुटबॉलमधील प्रसिद्ध ड्रिब्लिंग तंत्राचे दर्शन घडवण्यात आले. याशिवाय स्पर्धेदरम्यान Nutmeg, Rabona, Elastico आणि Scorpion Kick यांसारख्या जगप्रसिद्ध फुटबॉल कौशल्यांवर आधारित अनेक डूडल्सही Google ने सादर केले. (Google Doodle for FIFA Final 2026)



फुटबॉल चाहत्यांसाठी खास पर्वणी :


Google चे हे विशेष डूडल केवळ अंतिम सामन्याचा उत्सव नसून, फुटबॉलच्या समृद्ध परंपरेला आणि खेळाडूंच्या अप्रतिम कौशल्याला दिलेली अनोखी सलामी मानली जात आहे. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील महामुकाबल्यापूर्वी Google च्या या सर्जनशील उपक्रमामुळे जगभरातील फुटबॉलप्रेमींचा उत्साह आणखी वाढला आहे. (Google Doodle for FIFA Final 2026)




Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक