PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या रोड-शोमुळे मुंबईत मेट्रो बंद!

  80

सुरक्षेच्या कारणास्तव घेतली खबरदारी


मुंबई : देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांकडून प्रचाराचा धडाका लावला जात आहे. अशातच निवडणुकीचे चारही टप्पे पार पडले असून आता पाचव्या टप्प्यासाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. मुंबईत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून मतदानाला केवळ चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईत सर्व पक्षांकडून प्रचाराला जोर देण्यात आला आहे.


या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधानांचा आज मुंबईत रोड शो होणार आहे, तर उद्या शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज सायंकाळी रोड शो होत असून या रोड शोसाठी ‘मेट्रो १’च्या प्रवाशांना वेठीस धरण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक - घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.