Konkan Railway Recruitment : सरकारी नोकरीची नामी संधी! कोकण रेल्वेत 'या' पदांसाठी मेगाभरती

'अशी' होणार निवड; जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली असून कोकण रेल्वेकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार कोकण रेल्वेत ४० हून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. जाणून घ्या नेमक्या कोणत्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्याचसोबत अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता यासंबंधीची संपूर्ण माहिती.



'या' पदांसाठी भरती



  • AEE/कॉन्ट्रॅक्ट - ३ जागा

  • सि. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल - ३ जागा

  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल - १५ जागा

  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/सिव्हिल - ४ जागा

  • डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल - २ जागा

  • टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल - १५ जागा


शैक्षणिक पात्रता



  • AEE/कॉन्ट्रॅक्ट - मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये किमान ६० टक्के गुणांसह डिप्लोमा किंवा पदवी

  • सि. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल - मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी

  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल - मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव

  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/सिव्हिल - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये किमान ६० टक्के गुणांसह डिप्लोमा किंवा पदवी

  • डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल - ITI ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आणि Auto CAD चे ज्ञान आवश्यक.

  • टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल - मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील ITI पदवी


वेतन



  • AEE/कॉन्ट्रॅक्ट - ५६,१०० रुपये

  • सि. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल - ४४,९०० रुपये

  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल - ३५,४०० रुपये

  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/सिव्हिल - ३५,४०० रुपये

  • डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल - ३५,४०० रुपये

  • टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल - २५,५०० रुपये


कोकण रेल्वे अर्ज प्रक्रिया


कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची पद प्रमाणे मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित पाहिजे. मुलाखतीची तारीख ही ०५,१०, १२, १४, १९, २१ जून २०२४ अशी आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.



कोकण रेल्वे वयोमर्यादा


कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३० वर्षापर्यंत उमेदवार या भरतीसाठी पात्र करण्यात येईल. सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी एससी/एसटी ०५ वर्ष सूट दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरीच्या उमेदवारांना ३ वर्षे सूट दिली गेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या वयोगटांनुसार पदांसाठी अर्ज करायचा आहे.


अधिकृत वेबसाइट - https://konkanrailway.com/


ऑफिशियल नोटीफिकेशन -


https://drive.google.com/file/d/17OUZWu0Pn3cnLVasKQwpbzkyaJa77O13/view


दरम्यान, ही कोकण रेल्वे भरती प्रक्रिया ९ मे पासून सुरु झाली असून याची अंतिम तारीख २१ जून २०२४ असणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा पूरेपूर फायदा घ्यावा असे सांगण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात