Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमSalman Khan House firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात सहावा आरोपी...

Salman Khan House firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात सहावा आरोपी ताब्यात!

मुंबई पोलिसांचे तपासयंत्र वेगाने सुरु

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर १४ एप्रिल रोजी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. यानंतर मुंबई पोलिसांनी हरियाणातील (Hariyana) फतेहाबाद येथून आणखी एकाला अटक केली आहे. हा सहावा आरोपी आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. त्यानंतर आज हरियाणामध्ये ही कारवाई करण्यात आली.

हरपाल सिंग (Harpal Singh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ३७ वर्षांचा आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हरपाल सिंगने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. आरोपीला आज विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आठवडाभरापूर्वी राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ७ मे रोजी राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक केली होती. राजस्थानमधून अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद रफिक चौधरी असे आहे. चौधरी याने या प्रकरणात अटक केलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना पैसे आणि रेकी करण्यासाठी मदत केली होती.

सलमान खानच्या घराजवळ १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने हालचाली करत आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, यातील एका आरोपीने अनुज थापनने (Anuj Thapan) १ मे रोजी तुरुंगात आत्महत्या केली. सध्या या प्रकरणाचा आणखी तपास सुरु आहे. हरपाल सिंगकडून आणखी काय खुलासे होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -