Monday, July 15, 2024
Homeनिवडणूक २०२४PM Narendra Modi : मुंबईत पंतप्रधानांच्या प्रचारांचा झंझावात!

PM Narendra Modi : मुंबईत पंतप्रधानांच्या प्रचारांचा झंझावात!

कल्याण-नाशिकमध्ये जाहीर सभा तर मुंबईत रोड शो

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीत निवडणुकांचे चारही टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. आता राजकीय पक्षांनी पाचव्या टप्प्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मुंबईत जंगी सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या अनेक ठिकाणी प्रचारसभा होणार असून पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे.

भाजपा (BJP) कुठलीही निवडणूक हलक्यात घेत नाही, हे वारंवार दिसून येत आहे. निवडणूक लागताच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे सर्वच नेते झाडून कामाला लागतात. पंतप्रधान मोदी हे तर देशभर सभांचा धडकाच लावतात. त्यांची सभा होईल तेथील उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असते. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कल्याण, भिवंडी, ठाणे लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी उद्या कल्याणमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. त्याबरोबर नाशिकच्या पिंपळगावमध्येही त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर मुंबईत रोड शो असणार आहे.

मुंबई रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शो नियोजनासाठी आज बैठक होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियोजन समितीची बैठक बोलावली आहे. यामुळे मुलुंड येथे आज दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला भाजपचे पदाधिकारी व नेते उपस्थित राहणार आहेत.

कल्याणमध्ये जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जंगी सभा कल्याणमध्ये होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर हे बापगाव परिसरात उतरणार आहे. यासाठी हेली पॅड तयार करण्यात आले असून हेली पॅडला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आधारवाडी जेल समोरील मैदानात होणार आहे. या मैदानात ५० हजाराहून अधिक आसन व्यवस्था असणार आहेत. त्याचबरोबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील असणार आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत देखील बदलण्यात आले आहेत. पोलिसांनी बदललेल्या मार्गांविषयी अधिसूचना जाहीर केली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -