Devendra Fadnavis : ....आणि म्हणूनच पाकिस्तानची भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही!

'अमोल कोल्हे केवळ नाटक करणारा माणूस, अशांना जनता त्यांची योग्य जागा दाखवेल'


देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना खोचक टोला


पिंपरी-चिंचवड : निवडणुकीच्या रणधुमाळीत (Loksabha Election 2024) चौथ्या टप्प्याची तयारी जोरदार सुरु आहे. देशभरात बड्या बड्या नेत्यांची प्रचार सभा धुमाकुळ घालत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये सभा घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानचे धागेदोरे एक करत काँग्रेसचा (Congress) समाचार घेतला. तसेच अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावरही चांगलाच निशाणा साधला.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, 'काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. त्यावेळी महाराष्ट्रासह देशात बॉम्बस्फोट व्हायचे. गेल्या दहा वर्षांत कोणी बॉम्बस्फोट करण्याची हिंमत केली नाही. कारण पाकिस्तानला माहीत आहे त्यांचा बाप दिल्लीत बसला आहे. त्यामुळे भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानची झाली नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर खोचक टोला लगावला.


त्याचपुढे, अमोल कोल्हे हे चांगले कलाकार आहेत. परंतु, कोल्हे यांचा सिनेमा फ्लॉप झाला आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या चित्रपटाची किंवा नाटकांची तिकीट नागरिक घेणार नाहीत. दरवेळीप्रमाणे यावेळी देखील त्यांनी मालिकांमधून निवृत्तीची घोषणा केली. हे केवळ नाटक आहे. अशा नाटक करणाऱ्याला जनता त्यांची योग्य जागा दाखवतील अशी खात्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.



मोदी फक्त भारताचेच नव्हे तर शंभर देशांचे नेते


जगातील शंभर देश म्हणतात कोविड काळात आम्ही नरेंद्र मोदी यांच्यामुळे जिवंत आहोत. म्हणजे आपले मोदी भारतात नव्हे तर शंभर देशांचे नेते आहेत. पुढे ते म्हणाले, इंडिया आघाडीला पाच वर्षांत पंतप्रधान निवडता आला नाही. ही काय घराणेशाही नाही? फॅक्टरी नाही. इंडिया आघाडीकडे नियत आणि नीती नाही. प्रत्येक नेता स्वतःच्या घरातील व्यक्तीला मोठं करण्यात व्यस्त आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : साड्या पाहण्याचा बहाणा केला अन् 14 तोळ्याचे दागिने पळवले

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14

Pune Crime : पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याची खळबळजनक घटना!

पुणे : कौटुंबिक वादातून चिडलेल्या एका महिलेने स्वतःच्याच ९ महिन्यांच्या निष्पाप पुतण्याच्या तोंडात अत्यंत

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीलाही

Pune Autorickshaw Fare Hike : पुणेकरांना महागाईचा झटका : १ सप्टेंबरपासून ऑटो रिक्षा प्रवास महागणार; RTA कडून नव्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब!

पुणे : पुणे शहर आणि परिसरात ऑटो रिक्षाने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता आपल्या खिशाला जास्तीची कात्री

Jalgaon : 'मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत 1 लाख वृक्षारोपण, १० ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात

Jalgaon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन (Green Maharashtra Mission) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका

Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर मुंबई :