Vidhan Parishad Election 2024 : लोकसभेनंतर महाराष्ट्रात लगेच होणार विधानपरिषद निवडणूक!

  208

जाणून घ्या कोणत्या जागांवर आणि किती तारखेला होणार मतदान...


मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. कार्यकर्त्यांसोबतच राजकीय नेतेमंडळीही उन्हातान्हात प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळाला लोकसभा निवडणूक संपली की थोडा ब्रेक लागण्याची शक्यता असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेनंतर लगेच महाराष्ट्रात चार जागांसाठी विधानपरिषद निवडणूक (Vidhan Parishad Election 2024) पार पडणार आहे.


विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील चार सदस्यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या शिक्षक (Teacher Constituency Election) आणि पदवीधर (Graduate Constituency Election) अशा प्रत्येकी दोन म्हणजेच एकूण चार मतदारसंघांत निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे. मुंबई, नाशिक आणि कोकण या विभागात निवडणूक जाहीर झाली असून येत्या १० जूनला मतदान होणार आहे.


दरम्यान, ७ जुलै २०२४ रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोटनिस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे भिकाजी तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


निवडणूक जाहीर झालेल्या विभागांपैकी दोन विभागात पदवीधर तर दोन विभागात शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यापैकी मुंबई आणि कोकण विभागात पदवीधर तर नाशिक आणि मुंबईसाठी शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहे. जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १३ जून रोजी मतमोजणी पार पडेल.



अर्ज भरण्याची प्रकिया कधी सुरू होणार?


चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया १५ मे रोजी सुरू होणार आहे. तर २२ मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ मे रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ मे आहे. तर प्रत्यक्ष मतदान हे १० जून रोजी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार असून मतमोजणी १३ जून रोजी होणार आहे.



काय आहेत उमेदवारीचे नियम?


पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यांमधून निवडणूक लढविण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी काही नियम आहेत. पदवीधर मतदारसंघातून मतदान करण्यासाठी संबंधित उमेदवाराने रितसर नोंदणी करणे आवश्यक असते. पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मतदाराने किमान तीन वर्षे आगोदर आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे गरजेचे असते.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ