Friday, May 9, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Shivaji Park Meeting : ठाकरेंना मागे सारत शिवाजी पार्कवर होणार मनसेचीच सभा!

Shivaji Park Meeting : ठाकरेंना मागे सारत शिवाजी पार्कवर होणार मनसेचीच सभा!

महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी १७ मे रोजी पहिल्यांदा एकत्र मंचावर येणार


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रचाराला आता जोर आला आहे. तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार आहे. त्यादृष्टीने आधीच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी योजनांची आखणी केली होती. प्रचाराकरता शिवाजी पार्कवर (Shivaji Park) १७ मे रोजी सभा घेण्यासाठी मनसे (MNS) व ठाकरे गट (Thackeray Group) या दोघांनीही अर्ज केले होते. मात्र, ठाकरे गटाला मागे सारत शिवाजी पार्कसाठी मनसेने बाजी मारली आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत.


मनसेने महायुतीच्या प्रचारासाठी १७ मे ला शिवतीर्थावर जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, निवडणूक जाहीर झाली त्यावेळी सर्वप्रथम आमचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी परवानगीसाठी पत्र दिलं होतं. महापालिका व निवडणूक आयोगाचा नियम आहे की, ज्याची मागणी पहिली असते त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं, त्याप्रमाणे आम्हाला सभेची परवानगी मिळाली आहे. सभेच्या निमित्ताने राज ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र मंचावर येणार असल्याने मुंबईकरांसाठी भाषणाची व विचार ऐकण्याची ही पर्वणी असेल, असंही संदीप देशपांडे म्हणाले.


मुंबईत २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे ३ दिवस आधी होणारी ही सभा प्रचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या सभेत नेमके काय विचार मांडले जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment