मुंबई: ऑनलाईन डिलीव्हरीच्या वेळेस लहान-मोठ्या चुकांच्या तक्रारी येतच असतात. अनेकजण कंपनीकडे तक्रार करून अथवा सोशल मीडियावर मजा घेऊन शांत राहतात. मात्र अनेकदा गोष्टी इथक्या वाढतात की त्या कोर्टापर्यंत पोहोचतात. असेच काहीसे घडले गुजरातच्या अहमदाबादमध्ये.
येथील एका महिले ने पनीर सँडविच ऑर्डर केले होते. मात्र रेस्टॉरंटने चुकीने त्यांना चिकन सँडविच पाठवले. आता शुद्ध शाकाहारी महिलेने चुकीची शिक्षा म्हणून ५० लाखांची मागणी केली आहे.
निराली नावाच्य या महिलेने अहमदाबादच्या सायन्स सिटी स्थित आपल्या ऑफिसमधून पिक अप मील्स बाय टेरा या रेस्टॉरंटमधून पनीर टिक्क सँडविच मागवले होते. मात्र चुकीने त्यांना चिकन सँडविचच आले. जेव्हा तिने ते खाल्ले तेव्हा ते फार कडक लागले. तिला वाटले हे सोया आहे. मात्र नंतर समजले की ते चिकन होते. तिने कधीही नॉन व्हेज खाल्ले नव्हते. त्यानंतर माफी म्हणून तिने रेस्टॉरंटकडून ५० लाख रूपयांची मागणी केली आहे.
निरालीने आपली तक्रार अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या डेप्युटी हेल्थ ऑफिसरला पाठवली. फूड डिपार्टमेंटने ५००० रूपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र महिलेला हे मंजूर नव्हते. तीचे म्हणणे होते की ही घटना भयानक होते. हे मागे घेतले जाऊ शकत नाही. यावर केवळ ५००० रूपयांचा दंड पुरेसा नाही. त्यानंतर तिने ग्राहक न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, मी ५० लाखापेक्षा अधिक रूपयांचीही मागणी करू शकले असते मात्र यामुळे मला न्याय मिळाला नसता. रेस्टॉरंटने या प्रकरणात मौन बाळगले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…