Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांची घरवापसी; भाजपामध्ये केला पक्षप्रवेश

पालघरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने होती नाराजी


मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) पालघर लोकसभेची (Palghar Loksabha) जागा भाजपला सुटली आणि या ठिकाणी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. भाजप किंवा शिवसेना कोणालाही पालघरची जागा मिळाली तरी उमेदवारी गावितांना मिळेल, असा अंदाज होता. मात्र, भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. यानंतर नाराज असलेल्या गावितांनी हेमंत सावरा यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी आज पुन्हा एकदा आपला मूळ पक्ष असलेल्या भाजपामध्ये प्रवेश केला.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील हजर होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पालघरची जागा भारतीय जनता पक्षाला सुटली. त्यामुळे राजेंद्र गावित यांना उमेदवारीला मुकावे लागले. या सर्व घडामोडींमुळे गावित नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आता त्यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेत आपली नाराजी प्रकट केल्याचे बोलले जात आहे.



कसा होता गावितांचा प्रवास?


राजेंद्र गावित २०१४ साली पालघरमधून भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत भाजपाने युती केल्यानंतर शिवसेनेने पालघरची जागा उमेदवारासहित मागितली. त्यामुळे गावित पुन्हा एकदा शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता भाजपाने त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांचे योग्य ते पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गावितांचा आज भाजपामध्ये पुनर्प्रवेश पार पडला.

Comments
Add Comment

राज्यात ५,८६६ कोटी रुपये बँकांमध्ये बेवारस

मुंबई : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्य शिल्लक आहेत. महाराष्ट्र

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी

मुंबईत 'मेगा ब्लॉक'मुळे होणार 'या' मार्गांवरील प्रवाशांचे हाल!

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगित मुंबई:

मुंबईतील २९५ बेकरींवर महापालिकेचा 'प्रहार'; बेकरींना 'पीएनजी-एलपीजी' किंवा इलेक्ट्रिक ओव्हन वापरणे बंधनकारक

मुंबई: स्वच्छ, हरित इंधनाकडे (Cleaner, Green Fuels) वळण्याच्या अनिवार्य आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या शहरातील मोठ्या

मुंबईतील कबूतर प्रकरण चिघळलं; जैन मुनींच्या वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापलं

मुंबई : मुंबईत सध्या कबूतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha : कबुतर आमचं चिन्ह! जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, आता आमचाही पक्ष असेल; जैन मुनींची घोषणा!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न (Pigeon Feeding Issue) मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. कबुतरांना