ठाणे : ठाणे जिल्हा (Thane Loksabha) हा धर्मवीरांचा ठाणे जिल्हा आहे, बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे. सर्व पक्ष महायुतीच्या सोबत आहेत असून ते विकासाच्या सोबत आहेत. या ठिकाणी कितीही सभा झाल्या तरी बुथवर काम करायचे आहे, बुथवर काम करून हक्काचे मतदार आपल्याला उतरवायचे आहेत. मागील निवडणुकीत उमेदवाराला लीड कोणी दिला, मेहनत कोणी केली, मोदी सांगतात बुथची लढाई जिंका, मागच्या अनेक निवडणुकांचा रेकॉर्ड आपण तोडू शकतो, धर्मवीरांना साजेसे असे काम करायचे असून नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना निवडून आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी टेंभी नाक्यावर घेण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. देशाचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर देश बुडवण्यासाठी इंडिया अलायन्स आहे. मोदींच्या विरोधात एक जण रॅली आणि सभा घेत आहे तो फेल जाणार असून मोदींना हरवणे कठीणच नाही तर अशक्य आहे असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केला. विरोधकांकडे मशाल नसून आईस्क्रीमचा कोन आहे जो उन्हात वितळणार असल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावरही यावेळी निशाणा साधला.
नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरला आहे. मागचा उमेदवार आपल्याच मेहनतीवर निवडणूक आला असून आता ४०० पार मध्ये नरेश म्हस्के हवे की नको? असा सवाल करत बूथ स्तरावर जोरदार काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उन्हा तान्हात लोकं एकत्र येत आहेत. या देशात यापूर्वी बॉम्बस्फोट आणि आतंकवादी कारवाया झाल्या. मात्र २०१४ नंतर एकाने तरी हिंमत केली का अशा कारवाया करण्याची. मोदींनी घरात घुसून मारू असा दमच पाकिस्तानला दिला असून केवळ एवढ्यावर न थांबता सर्जिकल स्ट्राईक देखील केले. मोदी हे देशासाठी निरंतर काम करत असून त्यांनी आणि मी एक दिवस पण सुट्टी घेतली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्या संविधानावर देश चालतो ते कोणीही बदलू शकत नाही उलट बाबासाहेबांना पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले हा इतिहास विसरता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. २०१५ नंतर मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…