Maharashtra day : महाराष्ट्र दिनानिमित्त अथर्व सुदामेसोबत राज ठाकरेंचं पहिलं रील!

खास संदेश देणारी रील होतेय तुफान व्हायरल


मुंबई : रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अथर्व सुदामेचा (Atharva Sudame) प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या रील्स अपलोड केल्यानंतर झटक्यात व्हायरल होत असतात. आजवर अनेक मोठमोठे कलाकार अथर्वसोबत रीलमध्ये दिसले आहेत. त्याच्या रील्स या अनेक मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने तो मराठी चित्रपटांचे प्रोमोशनही करतो. इतकंच नव्हे तर त्याने गानसम्राज्ञी आशा भोसलेंसोबतही (Asha Bhosale) एक रील केली होती, जी खूप व्हायरल झाली. यानंतर आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत अथर्वने एक रील केली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra day) ही रील बनवण्यात आली असून यातून एक खास संदेश देण्यात आला आहे.


राज ठाकरेंच्या या रीलमध्ये अथर्व सुदामे महाराष्ट्र दिनानिमित्त एका भाषणाची तयारी करताना दिसतो. सुदामेच्या भाषणात महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तींचा उल्लेख आहे. तेवढ्यात राज ठाकरे तिथे येऊन अथर्वचं ते भाषण पाहतात, त्याचं कौतुक करतात आणि म्हणतात, तुझं भाषण चांगलं आहे. अनेक थोरांचे त्यात उल्लेख आहेत. परंतु, आपण आज काय करतोय ते सांगणं देखील गरजेचं आहे. त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कर्तृत्व गाजवलं आणि महाराष्ट्र मोठा केला. आज आपण असं काय करणार आहोत ज्याद्वारे महाराष्ट्र आणखी पुढे जाईल. त्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आपण मराठी भाषा रुजवली पाहिजे. आपण आपल्या भाषेत बोललं पाहिजे. समोरचा माणूस हिंदीत बोलल्यावर आपण घरंगळत त्याच्याशी हिंदीतच बोलतो. त्याची काही आवश्यकता नाही. मराठीचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवणं गरजेचं आहे. ते करताना आपण आपला खारीचा वाटा उचलणं हे आपलं कर्तव्य आहे, असा संदेश राज ठाकरे देतात.


महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी नेहमी आग्रही भूमिका घेणारे राज ठाकरे यांनी वेगळ्या स्टाईलमध्ये महाराष्ट्र दिनाचा शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिन कसा साजरा करायला हवा, आपल्या भाषेसाठी आणि राज्यासाठी प्रत्येकाने कशी आग्रही भूमिका घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन केलं आहे. यासाठी त्यांनी तरुणाईचं आवडतं रील हे माध्यम निवडलं आहे.





अथर्वच्या जवळजवळ सर्वच रील्स या पुणे, तिथली संस्कृती आणि पुणेकरांचे बोचरे टोमणे यांवर आधारलेल्या असतात. या सर्व रील्स तो मराठीतून करतो. त्यामुळे तो राज ठाकरेंचाही आवडता आहे. मनसेने तरुणांसाठी आयोजित केलेल्या रीलबाज स्पर्धेमध्ये अथर्व सहभागी झाला होता. तेव्हा राज ठाकरेंनी 'हा माझा अत्यंत आवडता' असं म्हणत त्याचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. अथर्वने रीलबाज हा पुरस्कारही पटकावला. ही गोष्ट देखील प्रचंड व्हायरल झाली होती. यानंतर आता राज ठाकरेंनीही लाडक्या अथर्वसोबत आपलं पहिलंवहिलं रील बनवलं आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह