School Admission : शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी हे वाचा!

महाराष्ट्रात ६६१ तर मुंबईत १८६ बेकायदेशीर शाळा, नवी मुंबईतही ५ शाळा अनधिकृत


नवी मुंबई : नवी मुंबईमधील (Navi Mumbai) शाळांमध्ये आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेणाऱ्या (School Admission) पालकांना नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) सावध केले आहे. राज्याची कोणतीही मान्यता नसलेल्या अनधिकृत अशा पाच शाळा नवी मुंबई शहरात सुरू आहेत व अशा शाळांमध्ये आपल्या मुलासाठी प्रवेश घेणे टाळा, असे पालिकेने म्हटले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शहरातील ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. बेकायदा घोषित केलेल्या या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत.


महानगरपालिकेने या शाळांमध्ये प्रवेश (School Admission) घेऊ नये असे सांगितले आहे. तसेच या शाळांमध्ये आधीच शिकत असलेल्यांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘या शाळा योग्य प्रक्रियेचे पालन न करता कार्यरत आहेत. त्यांनी राज्याची किंवा महामंडळाची कोणतीही मान्यता घेतलेली नाही. शाळेने आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला तरीही, येथे शिकणाऱ्यांचे भविष्य धोक्यात येईल.


या शाळांना, शिक्षण हक्क कायद्यानुसार परवानग्या मिळवा किंवा दंडात्मक कारवाईसाठी तयार राहा, अशा सूचना देणाऱ्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.


दरम्यान याआधी डिसेंबर २०२३ मध्ये, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लेखी उत्तरात माहिती दिली होती की, महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या ६६१ शाळांवर कारवाई सुरू करण्यात आली असून खासगी संस्थांना दंड ठोठावण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हद्दीत सुरू असलेल्या १८६ बेकायदेशीर शाळांची माहिती त्यांच्या विभागाकडे असल्याची पुष्टीही केसरकर यांनी केली होती.



अनधिकृत घोषित केलेल्या शाळांची यादी



  • अल मोमिना स्कूल, बेलापूर.

  • इकरा इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ.

  • ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, सीवूड्स.

  • शालोम प्रायमरी स्कूल, तुर्भे.

  • इलिम इंग्लिश स्कूल. रबाळे.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला