उन्हाळ्यात पोट थंड ठेवायचे असेल तर वापरा या खास आयुर्वेदिक टिप्स

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत आपली पाचनशक्ती बिघडून जाते. अशा स्थिती लक्ष देणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पाचनतंत्र निरोगी राखू शकता.


आयुर्वेद सांगतेल की चांगल्या आरोग्याची सुरूवात पाचनाने होते. चांगले स्वास्थ आणि कल्याणासाठी चांगले पाचन राखणे गरजेचे असते. चांगल्या पाचनासाठी ७ आयुर्वेदिक टिप्सचे पालन केले पाहिजे.


उन्हाळ्यादरम्यान पाचनतंत्र चांगले ठेवणे शरीरासाठी गरजेचे असते. उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. यामुळे बद्धकोष्ठता, सूजसारख्या पाचनेच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून बचावासाठी काही आयुर्वेदिक टिप्सचे पालन करणे गरजेचे असते.


खाण्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. यासाठी आपण असे पदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यात फायबरचे प्रमाण अधिक असेल. आपण भाज्या, अख्खे धान्य, फळे, सुकामेवा आणि बियांचे सेवन केले पाहिजे.


पाचनशक्ती सुधारण्यासाठी मसाले कमी खाल्ले पाहिजेत. आयुर्वेदात वापरली जाणारी औषधी जसे त्रिफळा पाचनामध्ये मदत करतात.


मसाल्याप्रमाणेच दिसणारे आलेही पचनामध्ये लाभदायक ठरते. आल्याचा वापर भोजनामध्ये केला जाऊ शकतो. तसेच आल्याचा चहाही तुम्ही पिऊ शकता. आयुर्वेदानुसार जिरे, धणे आणि बडिशेपाचा वापरही जेवणात केला पाहिजे. यामुळे पचनासंबंधी समस्या दूर होतात.


दही, घरी बनवलेले लोणचे, ताक, भाताची पेज तसेच इतर प्रोबायोटिक्स भरपूर खाल्ले पाहिजे. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे