संपूर्ण जीवनात एक तरी विकास काम केलेले दाखवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना आव्हान


सोलापुर : उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास पाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले विकासाचे एक काम तरी सांगावे. संपूर्ण जीवनात उद्धव ठाकरे यांनी एक तरी विकास काम केलेले दाखवावे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


सोलापुरात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा झाली. या निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दाखल होताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जीवनात एक तरी विकास काम केलेले आहे का? ते मला दाखवा. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी होते. मात्र, त्यांनी विकासाचे कुठलेच काम केले नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. संजय राऊत ही व्यक्ती कोण आहे? ते मला माहिती नाही. पण ठाकरेंनी मी म्हणजेच महाराष्ट्र आहे, या मानसिकतेतून बाहेर यायला हवे, अशी टीका त्यांनी केली.


भारतीय जनता पक्ष धार्मिक प्रचारात गुंतला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आला होता. त्यांना आजही राम नाव वापरावे लागत असल्याचे ते म्हणाले होते. याला देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही राम - राम करतो याचा शिवसेनेला इतका राग का येतो? भारतामध्ये राम राम नाही म्हणायचे तर पाकिस्तानात म्हणायचे का? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. आम्ही राम राम म्हणणारच, असे देखील फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला