माणगाव : लोकसभेची निवडणूक देशातील १४०० कोटी जनतेसाठी अत्यावश्यक असून गेल्या दहा वर्षात आपल्या देशाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी जगाच्या पाठीवर नेले. एक प्रगत देश, विकसित भारत,आत्मनिर्भर भारत या सर्वांचे श्रेय मोदी साहेबांना जाते म्हणूनच त्यांचे हात बळकट करण्यासाठी कोकणच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपले कोकण अधिक समृध्द व्हायला हवे. येथे रोजगाराच्या संधी वाढवतानाच,गावागावात विविध माध्यम,योजनांतून संपन्नता पोहोचविण्यासाठी लोकसभेत आपला हक्काचा खासदार असायला हवा. भाजपने लोकसभेसाठी मला उमेदवारी देऊन तुमची सेवा करण्याची संधी दिली आहे.आता आपले योगदान मोठे असायला हवे. कमळ चिन्ह लक्षात ठेवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले.
माणगाव खोऱ्यातील वाडोस येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे शनिवारी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.
यावेळी नारायण राणे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण जगात महागुरु म्हणून ओळखतात त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करा. १९९०पासून मी विविध पदावर कार्यरत असून अनेक मंत्रीपदे मला मिळाली. येथील विकास कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्ह्यात लवकरच फळ प्रक्रिया उद्योगही ओरोस येथे होणार आहे. दोडामार्ग जवळ आणि जिल्ह्यातील चिपी या दोन्ही विमानतळासाठी आवश्यक रस्ते व भौतिक सुविधा पूर्ण झाल्या आहेत. दोडामार्गात पाचशे कारखाने आणून येथील युवकांच्या हाताला काम देणार आहे.
येत्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा देशातील प्रगतशील जिल्हा म्हणून ओळखला जाईल जिल्ह्यातून कोल्हापूर रस्ता, रेल्वे मार्ग, चार पदरी रस्ते ,विमान आदि कामे पूर्ण झाली आहेत. एवढे करूनही उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करत आहेत. आपण मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात कोणतीही विकासकामे केली नाहीत हे जनतेला आता समजले असून येत्या निवडणुकीत भाजप म्हणजेच महायुतीला मतदान करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची संधी द्या. जिल्ह्यातील मुले आयपीएस ,कलेक्टर व्हावेत यासाठी विविध कॉलेज शैक्षणिक सुविधा पूर्ण करणार असून उद्योगाबाबत जिल्ह्यात विविध अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन येथील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे राणे म्हणाले.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…