Devendra Fadnavis : आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी!

काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सणसणीत टीका


सांगली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेते उन्हातानात सभा घेत विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आज सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यांनी सभेला संबोधित करताना शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी (Naremdra Modi) यांनी काय केले?, अशी टीका शरद पवारांनी अनेकदा केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत 'काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं', अशी खोचक टीका केली. शिवाय 'आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे', असा टोलाही त्यांनी लगावला.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सांगलीमध्ये संजयकाका पाटील यांच्यासह अजून काही उमेदवार आहेत. या उमेदवारांची ही निवडणूक नाही. या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक पर्याय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी. एकीकडे आपली महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वांमधील आहे. आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लावले आहेत. ही आपल्या विकासाची ट्रेन आहे. या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत. महायुतीची ही गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे. विरोधकांकडे काय अवस्था आहे”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.


पुढे ते म्हणाले, “राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, तर शरद पवार म्हणतात मी इंजिन, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन. आता त्यांच्याकडे कोणीही डब्बे लावायला तयार नाही. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. त्यांच्या इंजिनमध्ये जनतेसाठी जागा नाही. काँग्रेसच्या सरकारने अनेक वर्षे राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगली. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले. दुसरीकडे आपण ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.



देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला


“ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, त्यावेळी महाराष्ट्रातील एका नेत्याने म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी यांना उसाच्या शेतीबाबत काय कळतं. नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्याबाबत काय कळतं. मात्र, आज दहा वर्षांनंतर मी दाव्याने सांगतो, ६० वर्षांचा त्यांचा इतिहास काढा आणि १० वर्षांचा मोदींचा कार्यकाळ काढा. साखर कारखान्यांसाठी आणि उसाच्या शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले, तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नव्हते”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि