पंजाबने रचला नवा विक्रम!
PBKS Vs KKR: पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करनने सुरुवातीला नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकत्तासाठी खेळताना फिल सॉल्टने अर्धशतक झळकावले, त्याचा सलामीचा साथीदार सुनील नारायणनेही अशीच कामगिरी केली. नरेन 32 चेंडूत 71 धावांवर बाद झाला आणि राहुल चहरने त्याची विकेट घेतली.
दरम्यान, सॉल्टने देखील 37 चेंडूत 75 धावा करत सॅम करनच्या चेंडुवर विकेट गमावली. तसेच अर्शदीप सिंगने आंद्रे रसेल (24) आणि श्रेयस अय्यर (28) यांना बाद केल्याने केकेआरने 20 षटकांत 6 बाद 261 धावांचा डोंगर उभा केला.
पंजाब किंग्सने 262 धावांचा पाठलाग कोलकत्ताच्या गोलंदाजांना हैराण करुन सोडलं. जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंग या जोडगोळीने धावांचा आक्रमकतेने पाठलाग केला. प्रभसिमरन सिंगने सहाव्या षटकात 20 चेंडूत 54 धावांवर आपली विकेट गमावली.त्यानंतर आलेल्या रिले रोसोने १६ चेंडुत २६ धावा बनवत सुनील नारायणच्या षटकात बाद झाला.
नवोदित भारतीय खेळाडु शशांक सिंगने २८ चेंडुत ६८ धावा करत पंजाबसाठी आक्रमक खेळी केली. तर बेअरस्टोने ४८ चेंडुत नाबाद १०८ धावांची खेळी करत पंजाबच्या पारड्यात विजश्री खेचुन आणला. या विजयासोबत पंजाबने सर्वात जास्त धावा परतवून लावण्याचा विक्रम देखील केला आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…