Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीPushpa 2 The Rule : 'पुष्पा-पुष्पा' गाणं येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Pushpa 2 The Rule : ‘पुष्पा-पुष्पा’ गाणं येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘पुष्पा २: द रुल’ मधील पहिल्या गाण्याचा प्रोमो आऊट; प्रेक्षकांचं वेधले लक्ष

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुष्पा-२ या चित्रपटामधील ‘पुष्पा पुष्पा’ या पहिल्या गाण्याचा प्रोमो रिलीज केला आहे. देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे पुष्पाची उत्सुकता आणखी वाढवत आहे. ‘पुष्पा: द राईज’ चित्रपटाचे संगीत जगभर लोकप्रिय झाल्या नंतर आता ‘पुष्पा पुष्पा’ या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

या दिवशी चित्रपटातील पहिल गाण प्रदर्शित होणार

अल्लू अर्जुनने गाण्याचा प्रोमो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “‘पुष्पा पुष्पा’ १ मेला सकाळी ११.०७ वाजता भेटीस येत आहे”, असं कॅप्शन लिहित अल्लू अर्जुनने गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. प्रेक्षकांनी या बद्दल उत्सुकता व्यक्त करत या बद्दल भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -