Education Department : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल ४७ लाख ६० हजारांची चोरी!

Share

शासन विभागात याच महिन्यात चोरीची दुसरी घटना

मुंबई : संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा म्हणजेच मंत्रालयाच्या (Mantralaya) बँकेतून मोठी रक्कम चोरी झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Education Department) खात्यातून तब्बल ४७ लाख ६० हजार चोरीला गेले आहेत. मंत्रालयात प्रवेश करताना प्रत्येकाची अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. सीसीटीव्हीने सगळ्यांवर नजर असते तरीही हा प्रकार घडल्यामुळे यंत्रणा सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात ४७ लाख ६० हजार काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात चौघांवर कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ४७३, ३४ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. हे चौघे कोण आहेत? यामागे नेमका कुणाचा हात आहे? याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

याआधीही पर्यटन विभागातून झाली होती चोरी

अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे तब्बल ६७ लाख चोरीला गेले होते. याचा तपास मरीन लाईन पोलीस करत आहेत. शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Recent Posts

Shahapur Rain : शहापूरात रात्रभर पावसाची जोर ‘धार’!

भारंगी नदीला पूर, गाड्या वाहून गेल्या, वाहतूकही ठप्प खर्डी : जुलै महिन्याला सुरुवात होताच पावसाने…

8 mins ago

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा! तर दोन जवान शहीद

अकोल्यातील जवानाला २४ व्या वर्षी आले वीरमरण अकोला : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यात काल…

15 mins ago

Buldhana Crime : धक्कादायक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास महिलेचा नकार; डॉक्टराने केले असे काही…

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. बुलढाण्यात…

1 hour ago

Worli Hit and Run : धक्कादायक! वरळीत हिट अँड रन प्रकरणात महिलेचा मृत्यू

कारचालक फरार मुंबई : राज्यभरात हिट अँड रनच्या (Heat And Run) वाढत्या केसेसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले…

1 hour ago

रोजगारनिर्मितीसह विदर्भाच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : विदर्भात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधांनी परिपूर्ण औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यावर आपण…

1 hour ago

मुंबई मेट्रोला ४,६५७ कोटी निधी मिळणार!

मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ साठी केंद्र सरकारद्वारे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या…

2 hours ago