धावत्या रेल्वेत कसे ऑर्डर करणार बाहेरचे जेवण? ही आहे पद्धत

मुंबई: भारतीय रेल्वे(indian railway) आता जगातील सर्वात चांगली सुविधा देणारी रेल्वे सेवा बनत आहे. रेल्वेच्या प्रवासादरम्यान आता लोकांना बऱ्याच सुविधा मिळतात. याआधी लोकांना रेल्वेच्या आत जे काही खायला मिळत असे तेच ऑर्डर करता येत होते. मात्र आता लोक रेल्वेमध्ये बसल्या-बसल्या बाहेरचे खाणे ऑर्डर करू शकतात. जाणून घ्या कसे ते...



अॅप अथवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मागवू शकता


भारीय रेल्वे प्रवाशांसाठी सतत चांगल्या सोयीसुविधा आणत आहे. आता प्रवाशांना आपल्या आवडीचे खाणे रेल्वेत बसल्या बसल्या मिळणार आहे. आयआरसीटीसीकडून यासाठी वेगळी वेबसाईट बनवण्यात आली आहे. जेवण ऑर्डर करम्यासाठी तुम्ही www.ecatering.irctc.co.in वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता.


सोबतच भारतीय रेल्वेकडून +91-8750001323 हा व्हॉट्सअॅप नंबरही जारी करण्यात आला आहे. यावर मेसेज पाठवून तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता. तुम्ही केवळ जेवणच ऑर्डर करू शकत नाहीत तर तुमची ऑर्डर कुठपर्यंत आली हे ही पाहू शकता.



असे करू शकता ऑनलाईन ऑर्डर


रेल्वेमध्ये ऑनलाईन खाणे मागवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी www.ecatering.irctc.co.in या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या रेल्वेचा नंबर आणि बोर्डिंगची तारीख निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला स्टेशन निवडावे लागेल. यानंतर फाईंड फूड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.


यानंतर तुम्हाला रेस्टॉरंट निवडावे लागेल. यानंतर पीएनआर नंबर टाकून तुम्ही तुमचे खाणे ऑर्डर करू शकता. याशिवाय स्विगी, झोमॅटोसह अनेक फूड डिलीव्हरी कंपन्या आयआरसीटीसीसोबत मिळून प्रवाशांपर्यंत खाणे पोहोचवण्याचे काम करत आहेत.

Comments
Add Comment

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील