Hanuman Jayanti 2024: 'अशी' साजरी करा हनुमान जयंती; मिळेल सुख-समृद्धी व भरघोस यश

जाणून घ्या तिथी, शूभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत


मुंबई : हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. रामभक्त हनुमानाच्या पूजेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हनुमान जयंतीचा दिवस त्यांच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. या वर्षातील पहिली हनुमान जयंती मंगळवारी, चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच २३ एप्रिल २०२४ रोजी साजरी केली जाईल. यावेळी हनुमान जयंती मंगळवारी येत असल्याने तिचे महत्त्व आणखी वाढले आहे. सविस्तर जाणून घ्या हनुमान जयंतीचे शुभ मूहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत



हनुमान जयंती पूजेचा शुभ मुहूर्त:


हनुमान जन्मोत्सवातील पूजेची शुभ वेळ सकाळी ९ वाजून ३ मिनिटे ते १० वाजून ४१ मिनिटापर्यंत असेल. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४ वाजून २० मिनिटे ते ५ वाजून ४ मिनिटापर्यंत असेल. या दिवशी, अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५३ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत असेल.



हनुमानजयंती पूजा करण्याची पद्धत:



  • हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं. बजरंगबलीसमोर उपवासाचा संकल्प करा.

  • या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणं शुभ असतं.

  • हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला अर्पण करा.

  • यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा.

  • पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गुळ आणि हरभरा यांचा समावेश असावा. हनुमानाला बुंदीचे लाडूही अर्पण करता येतात.

  • यानंतर ७ वेळा हनुमान चालिसा पठण करा. या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं.
    आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे, अन्न आणि पैसे गरजूंना दान करा.

Comments
Add Comment

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

सरकारी रुग्णवाहिका नावालाच, महिलेची भर रस्त्यात प्रसूती

वावी हर्ष येथील घटना; आदिवासींच्या नशिबी नेहमीच वनवास नाशिक : दोन तासापासून कॉल करून रुग्णवाहिका न आल्याने गरोदर

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश