मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कल्कि 2898 AD’ या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका साकारणार असून त्यांचा या चित्रपटातील लूक समोर आला आहे. त्यांच्या या भन्नाट लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘कल्कि 2898 AD’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच दाक्षिणात्य सुपस्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच कमल हसन आणि दिशा पटानी हे कलाकार देखील कल्कि 2898 AD या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
समोर आलेल्या बिग बींच्या पोस्टरमध्ये ते साधूच्या अवतारात दिसून येत आहेत. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर पट्ट्या आहेत. अमिताभ बच्चन यांचा लूक आता समोर आला आहे. आता चित्रपटात ते कोणत्या भूमिकेत झळकणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ९ मे २०२४ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल. अमिताभ बच्चन यांच्या या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…