OMG! चारकोपमध्ये चाललंय काय? २० दिवसात ४ आत्महत्या

Share
महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीने केली आत्महत्या; २० दिवसांपूर्वी भावाने घेतला होता गळफास

मुंबई : मेघवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीने चारकोप येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घडना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या २० दिवसांतील ही चौथी घटना आहे. (OMG! What’s going on in Charkop? 4 suicides in 20 days)

चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत आव्हाड या ३३ वर्षीय तरुणाने नक्षत्र सीएचएलएस टॉवर, चारकोप येथे पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

प्राथमिक पोलीस चौकशीत असे आढळून आले की, आव्हाड फिल्म इंडस्ट्रीत काम करत होते. तीन वर्षांपूर्वी कोविड काळात पोलीस कॉन्स्टेबलशी त्यांनी लग्न केले होते.

कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २० दिवसांपूर्वी श्रीकांतचा धाकटा भाऊ प्रमोद (२७) याने ज्या पंख्याला गळफास लावला, त्याच पंख्याला श्रीकांत यांनी गळफास लावल्याचे समजते. मृत व्यक्तीला त्याच्या लहान भावाच्या मृत्यूमुळे खूप धक्का बसला होता आणि तो वारंवार कुटुंबियांना सांगत होता की त्याचा भाऊ त्याला फोन करत होता.

घटनेच्या वेळी, श्रीकांत यांची पत्नी बेडरूममध्ये होती. तर मृताने फ्लॅटच्या हॉलमध्ये गळफास लावून घेतला. बेडरुममधून बाहेर आल्यानंतर सदर प्रकार लक्षात आल्याने तिने शेजारी राहणार्‍या त्यांच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना सूचित केले आणि ताबडतोब मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेला. जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पंचनामा केल्यानंतर, चारकोप पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात पाठवला.

चारकोप परिसरात काही दिवसांतील ही दुसरी आत्महत्या आहे. याआधीची घटना १० एप्रिल रोजी घडली, जेव्हा प्रवीण अचलखाम (२३) या तरुणाने कांदिवली पश्चिम येथील भाबरेकर नगर येथील परिश्रम बिल्डिंगमधील राहत्या घराच्या सतराव्या मजल्यावरून उडी मारली. त्याआधी एक दिवस, अचलखामच्या बालपणीच्या मित्राचा मृत्यू झाला होता आणि त्याला त्याचा धक्का बसला होता. कठोर पाऊल उचलण्यापूर्वी तो आपला मित्र आपल्याला बोलावत असल्याचे ओरडत घराबाहेर पळाला होता. घटनेच्या वेळी, अचलखामचे आई-वडील आणि भावंडे घरात होते, असे पोलिसांनी सांगितले.

त्याच दिवशी २२ वर्षीय अजय जांगीडने चारकोप येथील राहत्या घरी दुपट्ट्याने गळफास लावून घेतला. अजय हा लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. तपासादरम्यान तो डिप्रेशनशी झुंजत असल्याचे समोर आले. त्याच्या पालकांनी त्याला त्याचा अभ्यास सोडून कौटुंबिक व्यवसायात मदत करण्यास सांगितले आणि तो सहमत झाला. पण अचानक काय झाले, कोणालाही माहिती नाही. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Tags: OMGsuicide

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

34 mins ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

1 hour ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

2 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

2 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

3 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

4 hours ago